आयटीआय परीक्षेत मानव कांबळे औरंगाबाद विभागातून तिसरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 19 September 2022

आयटीआय परीक्षेत मानव कांबळे औरंगाबाद विभागातून तिसरा

किनवटः प्रशिक्षण महासंचालनालयाच्या (डीजीटी) वतीने घेण्यात आलेल्या कॉम्प्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंटच्या (कोपा) परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आदिवासी) विद्यार्थी मानव रवि कांबळे हा गुणवत्ता यादीत औरंगाबाद विभागातून तिसरा आला आहे.

ऑगस्टमध्ये प्रशिक्षण महासंचालनालयाच्या वतीने क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीमच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत कॉम्प्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (एनएसक्यूएफ) ट्रेडचा विद्यार्थी मानव रवि कांबळे याने ६०० पैकी ५५१ गुण संपादित केले. त्याने मिळवलेल्या गुणांची टक्केवारी ९१.८३ टक्के आहे. या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून मानव कांबळे हा गुणाक्रमे औरंगाबाद विभागातून तिसरा तर राज्यातून २९ वा आला आहे. या यशाबद्दल मानवचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages