नांदेड शासकीय विश्रामगृह येथे राज्यस्तरीय प्रेरक संघटनेची बैठकीचे संपन्न ! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 18 September 2022

नांदेड शासकीय विश्रामगृह येथे राज्यस्तरीय प्रेरक संघटनेची बैठकीचे संपन्न !

नांदेड : येथील शासकीय विश्रामगृहात प्रेरक प्रेरिका संघर्ष संघटनेची राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष माणिक कांबळे बारडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. 

संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय साक्षरता अभियान योजनेची अंमलबजावणी माहे जानेवारी २०१२ पासून सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक गाव वाडी तांड्यावरील शाळेवर दरमहा दोन हजार रुपये मासिक मानधनावर काम करणारे सुशिक्षित बेरोजगार पदवीधरांना  शिकविण्याचे काम मिळाले असल्यामुळे, प्रेरकांनी ज्ञानदान हे पवित्रदान समजुन ते काम आपल्या हातून होत आहे. या उदात हेतूने अतिशय तळमळीने, कष्टाने,मेहनतीने शिकविण्याचे काम सुरू केले होते. परंतु राज्य व केंद्र शासनाने हे मानधन वेळेवर न दिल्याने त्यांच्या कुंटूबावर उपासमारीची वेळ आली असुन , कष्टाचा व घामाचा दाम वेळेवर मिळाला तरच पुढील काम करण्यास ऊर्जा मिळते या आशेपोटी त्यांनी सातत्याने शिकविण्याचे काम करीत आहेत. परंतु शासनाने या प्रेरक प्रेरिकांना अद्याप पर्यंत मानधन न दिल्याने त्यांचे अख्खे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.जर प्रेरक प्रेरिकांचे थकीत मानधन तात्काळ मिळाले नाही तर, या शासनाच्या धोरणाविषयी व प्रेरक प्रेरकांच्या मागण्या घेऊन शिक्षण विभाग मंत्रालय मुंबईकडे पाठपुरावा करून मागण्या मंजूर करण्यासाठी आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून कालबद्ध कार्यक्रम तयार करून शासनाच्या विरूध्द तिव्र आंदोलन उभे करु असा सर्वानुमते बैठकीत ठराव घेण्यात आला असुन यावेळी नांदेड येथे दिनांक नांदेड  शासकीय विश्रागृहात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत उपस्थित प्रेरक प्रेरिका संघर्ष संघटनाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष माणिक कांबळे बारडकर यांनी उपस्थित प्रेरक प्रेरिकांना मार्गदर्शन करतांना  तालुकानिहाय बैठकीचे आयोजन करावे असे आवाहन केले तर यावेळी प्रभाकर व्यव्हारे,  जिल्हा महासचिव सदाशिव पतंगे पाटील, सचिव मोहन जाधव, महिला जि. अध्यक्ष पार्वती केंद्रें , ता अध्यक्ष मुदखेड गणेश जाधव, गंगाधर वासनिकर, होनशेट्टे, फेरोज पटेल, हदगाव संतोष दोडके, नायगांव तालुका सचिव दिपक गजभारे घुंगराळेकर, माधव वाघमारे, माने बाबाराव सिद्धार्थ हणमंते, मारोती सोनकांबळे, गौतम आढाव, सुरज घोंनशेटवाड ,आशाताई जाधव, सत्वशिला खंडगावकर, स्नेहलता गजभारे, गौतम भालेराव, देविदास कोंडलाडे , संतोष सुर्यवंशी आदी पदाधिकारी व जिल्हातून प्रत्येक तालुक्यातून शेकडो प्रेरक, प्रेरिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages