नाळ 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 30 September 2022

नाळ 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

 नांदेड ,जयवर्धन भोसीकर :

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.नाळ या चित्रपटाचा हा दुसरा भाग असेल.नाळ या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.आई मला खेळायला जायचय जावू दे न वं... हे गाणं चांगलच गाजल होत.

नुकतच नाळ 2 विषयी नागराज मंजुळे यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातुन हि माहिती दिली आहे.



मागच्या महिन्यात सुधाकरने Sudhakar Yakkanti अचानक फोन करून सांगितलं की नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकायला कधी भेटुयात ? 

नाळ चा दुसरा भाग काय होऊ शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी



अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं.


पहिल्या "नाळ" प्रमाणेच

'नाळ'चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे !


"नाळ 2" नावानं चांगभलं !!!




No comments:

Post a Comment

Pages