प्रज्ञा प्रसार धम्म संस्कार केंद्राच्या वतीने धम्मभूमी बुद्धलेणी,औरंगाबाद येथे २६ सप्टेंबर पासून भव्य श्रामणेर शिबिराचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 22 September 2022

प्रज्ञा प्रसार धम्म संस्कार केंद्राच्या वतीने धम्मभूमी बुद्धलेणी,औरंगाबाद येथे २६ सप्टेंबर पासून भव्य श्रामणेर शिबिराचे आयोजन

औरंगाबाद:

सालाबादप्रमाणे धम्मभूमी बुद्धलेणी, औरंगाबाद येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन(अशोक विजयादशमी) दिनानिमित्त पु. भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दि.२६ सप्टेंबर २०२२ रोजी पासून शिबिरास सुरवात होईल तर दि.६ ऑक्टोबर रोजी शिबीराचा समारोप होईल.

शिबिरासाठी १४ वर्षापुढील व्यक्तीस प्रवेश देण्यात येईल शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने मुंडन करून व दैनंदिन गरजेच्या वस्तू सोबत आणावे असे कळविले आहे.

श्रामणेर शिबारामध्ये त्रिसरण-पंचशील,अष्ठशील,परित्राण पाठ,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा,भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्याचे पठण करण्यात येईल तसेच समाजामध्ये एक जबाबदार नागरिक म्हणून त्याची जडणघडण व्हावी त्यावर महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव टाकण्यासाठी आदरणीय भिक्खू संघ, सामाजिक, धार्मिक , साहित्य क्षेत्रातील मान्यवर आदीं विविध विषयांवर श्रामणेर संघास मार्गदर्शनही करणार आहेत.

तरी आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी,बुद्ध तत्वज्ञान जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येने श्रामणेर शिबीराचा उपसकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भिक्खू नागसेन बोधी (थेरो), भन्ते उपाली, भन्ते बोधिधम्म, भन्ते आनंद,उपासक दादाराव सोनटक्के यांनी केले आहे.No comments:

Post a Comment

Pages