सत्यशोधक समाज सुवर्ण महोत्सव समितीच्या वतीने उद्या व्याख्यानाचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 23 September 2022

सत्यशोधक समाज सुवर्ण महोत्सव समितीच्या वतीने उद्या व्याख्यानाचे आयोजन

किनवट दि.२३: सत्यशोधक समाज-शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती,किनवट तर्फे सत्यशोधक समाज सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रबोधन व्याख्यानाचा पहीला कार्यक्रम उद्या(ता.२४) सकाळी १० वाजता एम.के.टी.शैक्षणिक संकूल,कोठारी (चि.ता.किनवट) येथे आयोजन करण्यात आला आहे.

   यावेळी प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर व प्रा. डॉ.शाम मुंडे यांचे "सत्यशोधक समाज व सद्यस्थिती", या विषयावर व्याख्यान होईल.अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके या राहतील.कार्यक्रमास शहर व परिसरातील जनतेनी उपस्थित राहावे,असे आवाहन शतकोत्तर सुवर्ण महोत्सव संयोजन समितिच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages