औरंगाबाद ( प्रतिनिधी ) दि 25 , अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, संलग्नित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शैक्षिक संघाच्या विभागीय कार्यकारिणीच्या दि. 24 सप्टेंबर 2022 आभासी बैठकीत चारही जिल्ह्यांच्या वतीने औरंगाबाद , बीड जालना व उस्मानाबाद एकमताने प्रोफेसर सुहास मोराळे माजी विद्यार्थी कल्याण संचालक व राज्यशास्त्र विभाग प्रमुख स्वा. सावरकर महाविद्यालय बीड यांची सर्व जिल्हा अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व सहमतीने सर्वानुमते प्राधिकरण सिनेट निवडणूक 2022--2023 साठी निवडणूक प्रमुख म्हणून घोषना करण्यात आली. डॉ सुहास मोराळे यांना 23 वर्षाचा शैक्षणिक , विद्यापीठात संवैधानिक पदाचा व एन. सी. सी . अधिकारी पदासोबत विद्यापीठातील विविध निवडणुकांचा अनुभव असुन दांडगा जनसंपर्क , सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती , मनमिळाऊ , अभ्यासु स्वभाव असल्याने आज पर्यंत प्राध्यापक , प्राचार्य व विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शैक्षिक संघाच्या वतीने निवडणूक प्रमुखाचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अध्यक्ष प्रोफेसर दिलीप अर्जूने महामंत्री प्रोफेसर सत्यप्रेम घुमरे महिला अध्यक्षा डॉ. महानंदा दळवी , डॉ. भगवान डोके ,डॉ.सोपान सुरवसे, डॉ. हेमंत वर्मा , डॉ. शहादेव रसाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Sunday 25 September 2022
प्रोफेसर सुहास मोराळे यांची विद्यापीठ सिनेट निवडणूक प्रमुख म्हणून निवड
Tags
# मराठवाडा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
मराठवाडा
Labels:
मराठवाडा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment