औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक अधिसूचना २६ रोजी प्रसिध्द झाली.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायदा अधिनियमानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अधिसभा , विद्यापरिषद व अभ्यास मंडळे या अधिकार मंडळावर सदस्य निवडणूकीची अधिसूचना २६ रोजी प्रसिध्द झाली .
उमेदवारांना उमेदवारी अर्ज २७ आक्टोबर ते ४ नोव्हेंबर पर्यंत साडेदहा ते पाच या कार्यलयीन वेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील.
५ नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी ,६ रोजी वैध व अवैध नामनिर्देशनपत्राची यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर कुलगुरू महोदयाकडे नामनिर्देशन पत्रा संदर्भात अपील ९ रोजी करता येईल,११ रोजी नामनिर्देशन मागे घेता यईल ,११ रोजी नामनिर्देशन दाखल केलेल्यांची यादी प्रसिध्द होईल.२० नोव्हेंबर रोजी मतदान तर २८ रोजी मतमोजणी होईल.
No comments:
Post a Comment