महात्मा ज्योतिबा फूले मा.व. उ.मा.वि. गोकुंदा येथे वाचन प्रेरणा दिन साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 15 October 2022

महात्मा ज्योतिबा फूले मा.व. उ.मा.वि. गोकुंदा येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

किनवट,दि.:माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती आज(दि.१५) वाचन प्रेरणा दिन म्हणून महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा, (ता.किनवट) येथे विविध उपक्रम राबवून संपन्न झाला. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य एच. ए. शेख, उपप्राचार्य एस.के. राउत, पर्यवेक्षक प्रा. एस. ए. बैसठाकूर, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.रघुनाथ इंगळे, प्रा. व्ही. ए. चव्हाण, प्रा. एस. डी. वाठोरे व प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. एच. एल. सोनकांबळे व प्रा. सुभाष गडलिंग हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाची ११ वी ची विद्यार्थीनी सिमरन शेख हिच्या देशभक्तीपर गिताने करण्यात आली. तदनंतर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस दीप प्रज्ज्वलित करून पुष्प अर्पण करून मान्यवराच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने मंचावर उपस्थित मान्यवराचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शन विभागाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विविध विषयावरच्या अनेक ग्रंथाची मांडणी करण्यात आली होती. त्याचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला.


कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाअंर्तगत प्रा. डॉ. हेमंत सोनकांबळे व प्रा. सुभाष गडलिंग यांना पाचरण करण्यात आले होते. त्यांची प्रकट मुलाखत प्रा.एस.एम. सर्पे यांनी घेतली. मुलाखतीस उत्तर देतांना लेखक, कवी प्रा. हेमंत सोनकांबळे यांनी आपल्या लेखन स्फूर्तीचे श्रेय भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिले. व विद्यार्थांनी परिस्थिचे भांडवल न करता स्वतः सिध्द करावे असे उद्बोधक विचार त्यांनी मांडले.

पाली साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. सुभाष गडलिंग यांनी त्यांच्या २००५ साली प्रकाशित चार आर्यसत्य या पुस्तकाचे सुलभ भाषेत विवेचन केले व पाली भाषा व भगवान बुध्द यांचा धम्मोपदेश यांचा सहसंबंध स्पष्ट केला.


अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य एच. ए. शेख यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर इथ पासून अथ प्रकाश टाकतांना एका सामान्य मानसाचे अलौकिक कर्तृत्व अशा शब्दात कलामांच्या कार्याचा गुणगौरव केला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.के. कांबळे यांनी केले, तर आभार प्रा. एस.एम. सर्पे यांनी मानले.सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.एस.जी.तम्मेवार, प्रा.आर.ए. जाधव, प्रा.एस.एम.सर्पे व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages