पँथरच्या लढ्याने सामाजिक विषमतेला तडे गेले - अविनाश महातेकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 15 October 2022

पँथरच्या लढ्याने सामाजिक विषमतेला तडे गेले - अविनाश महातेकर

नांदेड 15 : भारतीय दलित पँथरच्या लढ्यामुळे देशातील सामाजिक विषमतेला तडे गेले.लढणाऱ्याचा नव इतिहास निर्माण झाला.परंतु दलित-बहुजनांच्या वास्तवतेला राजकीय आकार मात्र मिळाला नाही.अशी खंत माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी येथे व्यक्त करत दलित पँथरचा लढाऊ इतिहास कुणालाही विसरता येणार नसल्याचे प्रतिपादन उदघाटक म्हणून बोलतांना त्यांनी व्यक्त केले.

   दलित पँथर ,भारतीय दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य  नांदेडमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार  जयदेव गायकवाड ,जेष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, प्रसिद्ध विचारवंत प्रा.एम आर.कांबळे  यांची यावेळी उपस्थिती होती.        

    सुरेश गायकवाड यांनी राज्यातील 150 पँथरचा गौरव सोहळा इथे घडवून आणला.हा कार्यक्रम म्हणजे उद्ध्वस्त झालेल्यांना एक प्रकारे वंदन करण्यासारखे आहे.असे सांगून महातेकर असे म्हणाले की,दलित पँथरच्या चळवळीने देशात फोफावलेल्या विषमतेला मोठे तडे दिले.पँथर चा प्रचार हा केवळभारता पुरताच मर्यादित नव्हता,तर तो भरताबाहेरही गेला होता.पँथरचे आयुष्य अल्पकालावधीचे असले तरी त्याकाळात जे लढे उभारले गेले त्याचा वेगळा इतिहास आहे.पँथर चळवळीच्या इतिहासाची मांडणी होत नाही.ज्या विचारावर पँथर उभे राहिले तो विचार आजही कायम आहे.म्हणून चळवळी तग धरून आहेत,हे नाकारता येत नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचायचे म्हणजे नेमके काय? असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले की,बाबासाहेबांच्या विचारावर सतत बोलले पाहिजे.आम्ही जे लढे उभे केले त्याचा पुनरुच्चार आजही पन्नास वर्षानंतरही कायम आहे.त्याची आठवण म्हणजे पँथरच्या अस्तित्वाची आठवण आहे.राज्यातील पँथरना एकत्रित आणून केलेला हा गौरव सोहळा अविस्मरणीय असा आहे.नांदेडकरांच्या या गौरवाने मी भरावल्याचेही ते म्हणाले.

             या प्रसंगी बोलतांना जयदेव गायकवाड यांनी नांदेडचा कार्यक्रम हृदयस्पर्शी ऐतिहासिक असाअसल्याचे सांगून पुढे म्हणाले की,या निमित्ताने अन्याय आत्याराच्या विरुद्ध बंड करून उठलेल्या 50  वर्षापूर्वीच्या पँथरना एकत्र आणण्याची किमया सुरेश गायकवाड यांनी साधली. पँथरची चळवळ केवळ आक्रमक होती असे नाही तर ती प्रचंड इमानदारही होती.पँथरमध्ये सहभागी झालेला आणि लढणारा कार्यकर्ता स्वार्थी नव्हता. पँथरच्या फुटीनंतर अनेकांनी आपली वेगळी वाट धरली,हे नाकारून चालणार नाही.सुरेश गायकवाड या लढाऊ पँथरने केलेलं काम हे कौतुकास्पद आहे.पँथरचा इतिहास पुन्हा लिहावा लागेल. हे काम नांदेडकरांनी करावे,असे आवाहनही त्यांनी केले. 

      याप्रसंगी पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी 50 वर्षापूर्वीची चळवळ आणि वर्तमानकाळात चालू असलेल्या चळवळीसंदर्भात सूक्ष्म निरीक्षण उपस्थितांसमोर ठेवले.चळवळीला इमानदार कार्यकर्ते मिळाले तरच ती गतिमान होते.अन्यथा चळवळ पुढे जात नाही .यासाठी समाजातील बुद्धीवंतांनी चवळीला बौद्धिक बळ द्यावे. असे आवाहन केले. याप्रसंगी एच.आर.कांबळे यांचेही समयोचित भाषण झाले.

     अध्यक्षीय समारोप करतांना सुरेशदादा गायकवाड यांनी कार्यक्रमाची भूमिका विषद केली.1972 ते 1976 च्या काळात पँथर मध्ये असलेले असंख्य कार्यकर्ते आज आंबेडकरी आणि बहुजन चळवळीचे नेतृत्व करीत आहेत. येथे सर्वांना बोलवत असतांना कोणताही राजकीय हेतू न ठेवता केवळ सन्मान व्हावा ,या उदात्त हेतूने कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. यावेळी पँथर लढ्यातील आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 150 हुन अधिक मान्यवरांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Pages