नांदेड दि.११ जयवर्धन भोसीकर : ६६व्या धमचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने जुन्या नांदेड शहरातील नावघाट येथे खुल्या जिल्हास्तरीय भिमगीत गायन स्पर्धेचे आयोजन बहुजन कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने करण्यात आले आहे .
मराठवाड्यातील सांस्कृतिक साहित्यीक चळवळीची पाळेमुळे जुन्या नांदेड शहरातील होळी नावघाट भागात रुजली आहेत येथील कवीवर्य दे. ल. महाजन.यांच्यपासून ते पंडीत नाथराव नेरलकर यांच्यापर्यंतच्या सांस्कृतिक चळवळीच्या वाटचाली बरोबरीने आंबेडकरी सांस्कृतिक ,सांगीतीक चळवळ सुरु झालेली असून आंबेडकरी विचारांचा जागर जुन्या पिढीतील भिमशाहीर प्रभाकर मोरे,संभाजीराव जोंधळे, दत्तात्रय काका जोंधळे,कवी गायक विठ्ठलराव जोंधळे,सिताराम जोंधळे,मोतीराम सोनसळे यांच्या पासून देवराव हुटाडे, मोहन नौबते, प्रल्हाद जोंधळे, नारायण सिरसिल्ला आदीनीबहुजन समाजात पोहचविण्या अनेक जुन्या कलावंत प्रतिभावतांनी आपले योगदान दिले आहे आजवर आंबेडकरी विचारांचा सांगितीक जागर अव्याहतपणे सुरु असुन ६६ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्याने दि. १६ आक्टो.रोजी रविवारी सकाळी १० ते ५ या वेळेत खुली भिमगीत गायन स्पर्धा नावघाट येथील मिगार माता बौद्धविहार प्रांगणात आयोजित करण्यात आली असून प्रथम पुरस्कार रोख ३००० रु. द्वितीय रु.२००० तृतीय बक्षीस रु.१००० असे परितोषक देण्यात येणार असून सर्वासाठी हि स्पर्धा खुली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी फीस रु.२०० ठरविण्यात आली असुन डॉ.शिवाजी कागडे भ्र. ९५४५१४९४२८, भिमराव वाघमारे भ्र.९४२१९४५८१२, संजय कदम भ्र. ९६२३०७४३११, व बहुजन कलावंत न्याय हक्क समीतीचे प्रदेश उपाध्यक्ष विकास जोंधळे भ्र. ८०० ७५८२४३८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मिगारमाता बौद्ध विहार समीती व आदर्श बौद्ध विद्यार्थी मंडळ नावघाट यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment