औरंगाबाद दि.११ 'इच्छा नसताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला ' असे निराधार,खोडसाळ व बौद्ध अनुयायांच्या भावना दुखावणारे बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने खा.आठवलेंविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी १ वाजता जोरदार आंदोलन करण्यात आले.
ह्यावेळी उपजिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे ह्यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना देण्यात आलेल्या निवेदनात कुठलीही नोंदणी नसतांना आरएसएस संघटना अब्जावधी रुपये गोळा करते,त्यांच्या कडे मोठा शस्त्रसाठा आहे,अनेक बॉम्बस्फोटामध्ये आर एस एस ,सनातन, अभिनव भारत,जय वंदे मातरम ह्या संघटनेच्या लोकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु केंद्र सरकार दहशतवादी संघटनावर कार्यवाही करताना भेदभाव करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच ह्या संघटना व त्यांना आर्थिक रसद पुरविणाऱ्या संस्था,संघटना,व्यक्ती ह्यांची इडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.
ह्यावेळी रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत रुपेकर,जिल्हाध्यक्ष प्रा.सिद्धोधन मोरे,काकासाहेब गायकवाड, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम,रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष मिलिंद बनसोडे,कामगार सेनेचे दिपक जाधव,गौतम साबळे,बबन साठे,युवा जिल्हाध्यक्ष राहुल कानडे,मनीषा साळुंखे,सचिन शिंगाडे,धम्मपाल भुजबळ,विकास हिवराळे,असकर खान,गणेश रगडे,अशोक दाणेकर,प्रवीण हिवराळे,कुणाल भालेराव,अॅड.अतुल कांबळे ,तुषार अवचार,अॅड.कुणाल झाल्टे,मिलिंद पट्टेकर,धम्मपाल रसाळ,सचिन जगधने,आनंद भिवसने,सिद्धार्थ भालेंद्र, आकाश मोकळे,ऋषीकेश सोनवणे,विशाल साळुंखे,सतीश शिंदे,छगन पवार,के जी पवार,गणेश कानडे, सज्जन पाबळे,ज्योती नवले,सुमनबाई बनकर,अरुण पठारे,सुंदर पवार,अबू चाऊस,शेषराव दाणे आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment