बिलोली शहरातील राजधानी देशी दारू दुकान त्वरित हटवा..बिलोली शहरातील विविध मागण्यासाठी मा.नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार आक्रम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 11 October 2022

बिलोली शहरातील राजधानी देशी दारू दुकान त्वरित हटवा..बिलोली शहरातील विविध मागण्यासाठी मा.नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार आक्रम

 


बिलोली , जयवर्धन भोसीकर :

बिलोली शहरातील राजधानी देशी दारू दुकान त्वरित हटवा या भागात पूर्वी तरुण मंडळी ,बुजुर्ग माणसे व्यायाम ,मॉर्निंग वॉक  साठी येत असत    पण देशी दारू दुकान थाटल्या पासून  त्या जागेत केवळ दारू चा अड्डा बनला  असून,शेतकरी ,मजुरी करणारे महिला ये जा करत असतात दारू पिणाऱ्या लोकां पासून त्यांना त्रास होतो,राजधानी दारू दुकान शहरा बाहेर स्थलांतरीत करा अन्यथा धरणे आंदोलनास पुढे जा असा ईशारा मा.नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार व सहकार्यांच्या वतीने देण्यात आला.

बिलोली शहरातील अन्य मागण्या पुढील प्रमाणे

बिलोली अर्जापुर रोडवर असलेली हिंदु स्मशानभूमी येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.मोठ्या तळ्यात शहरातील विविध मार्गाने येणारा घाण पाणी न सोडणे हा सर्व जमा होणारा पाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नालीचे पाणी बाहेर सोडण्यात यावे व तळ्याच्या काठावर असलेले झाडी झुडपे तोडून येथे चालण्या करीता  मॉर्निंग ट्रॅक तयार  करणे या मागण्या पूर्ण करण्यात यावे अन्यथा येणाऱ्या काळात धरणे आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे

गेल्या  तळ्यावरील झाडी झुडपे व घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे त्यारोड वरुन जाणारे येणारे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावे लागत आहे त्यामुळे सर्व बाबींकडे माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार यांनी झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्याचे काम करीत असुन नागरिकांची गरजा दुर करण्यासाठी धरणे आंदोलन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संतोष सुकलोड.अशुतोष संगमवार संजय कानुरे विजय तोटलवार.विनोद  जोरगेवार देवन्ना तदंरोड दिपक केशोड शिवाजी ठकरोड नितीश तदंरोड त्या अर्जावर नाव व स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages