औरंगाबाद,दि. 11 : राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पना मूर्त स्वरुप देण्यासाठी उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकटीकरणसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा दुसरा टप्पा, जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र 14 ऑक्टोबर रोजी अटल इनक्युबेशन सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर औरंगाबद येथे होणार आहे.
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्या दुसऱ्या टप्पामध्ये जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्रामध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलीटी (कचरा व्यवस्थापन, पाणी स्वच्छ उर्जा इ. ) ई- प्रशासन, स्मार्ट, पायाभूत सुविधा आणि जिल्हास्तरीय तज्ज्ञ समितीसमोर सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामधून जिल्हास्तरीय प्रथम 3 विजेत्याची निवड केली जाणार आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक रु. 25,000/-, द्वितीय पारितोषिक रु. 15,000 तृर्तीय पारितोषिक रु. 10,000/- दिले जाणार आहे. तसेच या सर्वोत्तम ती संकल्पना विजेत्यांना राज्यस्तरावर सादरीकरण्याची संधी मिळणार आहे.
सादरीकरणामध्ये http://www.mahastartupyatra.in/ या वेबपोर्टलद्वारे नोंदणी केलेले उमेदवार सादरीकरणामध्ये सहभाग घेणार आहेत. तसेच नव्याने इच्छुक उमेदवार सदर संकेतस्थळावर नोंदणी करुन सादरीकरणामध्ये सहाभागी होऊ शकतात.
जिल्ह्यातील विविध महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शैक्षणिक संस्थामधील नवसंकल्पना असणारे विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी, सुनील चव्हाण यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment