श्रावणदादा गायकवाड चर्मकार बांधवांसह घेणार १४ रोजी बौद्ध धम्मदीक्षा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 8 October 2022

श्रावणदादा गायकवाड चर्मकार बांधवांसह घेणार १४ रोजी बौद्ध धम्मदीक्षा

औरंगाबाद, दि. ८ (प्रतिनिधी) - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी हिंदू धर्माचा त्याग करून विज्ञानवादी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. देशातील मागास व इतर मागास समाजातील कोट्यवधी जनतेला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला. त्यांच्या या ऋणातून मूक्त होण्यासाठी याच दिवशी म्हणजे १४ रोजी मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर चर्मकार समाजातील हजारो बांधवांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेणार असल्याची माहिती आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्रावणदादा गायकवाड यांनी दिली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटने मध्ये ओबीसीसाठी ३४० कलम (३४० जाती), एस.सी.साठी ३४१ कलम ५९ जाती) व आदिवासीसाठी ३४२ कलम (४२ जाती) ची तरतूद करुन महाराष्ट्रातील जवळपास ४५० जातींना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थिक आरक्षणाचा फायदा मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात उंचावले आहे. म्हणून, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हिंदू धर्माचा त्याग करून हजारो चर्मकार समाजबांधव तथागथाचा मानवतावादी व विज्ञानवादी बौद्ध धम्माचा स्विकार करणार आहे. त्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर धम्मदीक्षा सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.


हा सोहळा सर्वांसाठी खुला असल्याने ज्यांना ज्यांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावयाची आहे, त्यांनी सचिन निकम ९२७००४९४५८, प्रविण बोर्डे- -८१८००००७७७, सत्यजित गायकवाड ८४२१३७८४८७, राहुल भालेराव ७७२१०६०६७०, विजेंद्र टाक ९८८१४११६१२


आणि महेश निनाळे ९४२२७२१३१२ यांच्याकडे नावनोंदणी करावी असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

धम्मदीक्षा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्य संयोजक मिलिंद दाभाडे नियोजन समितीचे सचिन निकम,   कैलास गायकवाड, किशोर गडकर, अँड. धनंजय बोडें, वसंतराज वक्ते, संतोष मोकळे, आनंद लोखंडे, किशोर खिल्लारे, अनिल सदाशिवे, सुरेश शिनगारे, चंद्रकांत रुपेकर, महेश तांबे, अनिल मगरे, मधुकर चव्हाण, बलराज दाभाडे, संदिप जाधव, मनोज वाहुळ, अरविंद कांबळे, प्रांतोश वाघमारे, मिलिंद बनसोडे, सतिश नरवडे, रामदास डोले, अरुण वासनकर, संजय जाटवे, सचिन गंगावणे, भिमराव भुजंग, कपिल बनकर व सोनू नरवडे परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages