आयुक्तांनी घेतला सर्व विभागांचा आढावा पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करावेत -विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 18 October 2022

आयुक्तांनी घेतला सर्व विभागांचा आढावा पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करावेत -विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर

 औरंगाबाद दि. 18 : जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. दरवर्षी या पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील मोठी आहे. अशा ऐतिहासिक वारशांची माहिती नागरिकांना द्यावी तसेच पर्यटकांची संख्या आणखी कशी वाढेल यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी दिले. 

  विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी  जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना,  उपायुक्त पराग सोमण, पांडुरंग कुलकर्णी, उपायुक्त श्रीमती वीणा सुपेकर, समीक्षा चंद्राकार, श्रीमती ॲलेस यावेळी बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी सादरीकरणाव्दारे सर्व विभागांच्या कामाची माहिती आयुक्तांना दिली. 

 आयुक्त पुढे म्हणाले की, वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. सर्व यंत्रणांनी दिलेल्या उदिष्टटांपेक्षा जास्त वृक्ष लागवड करावी, जनतेसाठी असणाऱ्या योजनांची विस्तृत दृष्टीकोन ठेवून अंमलबजावणी करावी, लंपी बाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार काम करावे, फेरफार प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा, ई-पीक पाहणी महत्वाचा उपक्रम असल्याने माहिती संकलित करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, ज्या तालुक्यात घनकचरा व्यवस्थापण आराखडा मंजुर झालेला आहे तिथे पुढील कार्यवाही  सुरू करा असे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले. 

  यावेळी विभागीय आयुक्तांनी निझामकालीन शाळांचे बांधकाम, ग्रामीण घरकुल योजना, रमाई आवास योजना, ई-चावडी, ई-हक्क प्रणाली, डीडीएम प्रणालीव्दारे दस्तएवज वितरण, उपविभागीय अधिकारी स्तरावर घोषणापत्र, ई-स्कॅनिंग, सौर ऊर्जा सबळीकरण, स्वच्छ भारत अभियान आदी विषयांचा आढावा घेतला. 



No comments:

Post a Comment

Pages