उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणातून रब्बी हंगामात पाणी पाळी साठीच्या उपाययोजना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 6 October 2022

उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणातून रब्बी हंगामात पाणी पाळी साठीच्या उपाययोजना

नांदेड,  दि. 6:- इसापूर धरणांचे मंजूर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार ऑक्टोंबर अखेर धरणाची पाणीपातळी 441 मी (100 टक्के) ठेवण्याचे निर्धारीत आहे. धरणात 15 ऑक्टोंबर 2022 रोजी 100 टक्के पाणी साठा होणार असून, उपलब्ध पाणीसाठ्याच्या अनुषंगाने उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी व उन्हाळी हंगाम पुर्ण क्षमतेने राबविण्याचे नियोजन आहे. या नियोजनास कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर पुढील पाणीपाळी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या (इसापूर धरणाच्या) लाभ क्षेत्रांतर्गत नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लाभधारकांनी यांची नोंद घ्यावी असे असे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ.बा.जगताप यांनी कळविले आहे.

हंगाम सुरु होण्यापूर्वी पुढील अटी व शर्तीची पुर्तता होणे आवश्यक आहे. रब्बी हंगामी, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/मंजूर उपसा/मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी/नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे. त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात 31 ऑक्टोंबर 2022 पुर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरुन सादर करावेत. पिकाचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसार पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकांस सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रीक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रीक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामूळे पाणी नदी नाल्यास वाया जावुन ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. सन 2022-23 च्या शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. थकीत व चालू पाणीपट्टी वेळेत भरावी. शेत चारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभ धारकांची राहील. उडाप्याच्या/अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरु असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही असे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.



No comments:

Post a Comment

Pages