प्रा.प्रमोद धुळे
औरंगाबाद.
येथील रांजणगाव शे.पु येथे ऍड.कपिल धुळे सर ( ऍडवोकॅट उच्च न्यायालय औरंगाबाद)तसेच ऍड.प्रसन्ना आठवले ( ऍडवोकॅट उच्च न्यायालय औरंगाबाद ) यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मुलींसंदर्भात नवीन कायदे व न्यायालयातील कामकाज तसेच मुलींना न घाबरता सर्व आपल्याला मिळणाऱ्या सरकारी मदती तसेच सवलती या संदर्भात सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले तसेच मुलींना नर्सिंग आणि त्यामधील रोजगार संधी याबद्दल सुद्धा विचार व्यक्त केले. व व्यावसायिक कोर्से करून आपण आपल्या पायावर उभे राहून समाजामद्ये एक आदर्श निर्माण करू शकतो. काळा कोट हा समाजातील गुन्हेगारी,आणि अन्याय अत्याचार याची लागलेली कीड नष्ठ करण्यासाठी काम करतो तसेच नर्सिंग चा पांढरा कोट हा समाजातील रुग्णांची सेवा करून त्यांना जीवनदान देण्याच काम करते.या दोघांनी जर आपल्या कामामद्ये चुकी केली जसे की नर्सिंग वाल्यानी पेशंटनि आपल्या आजाराची माहिती लपवल्यास त्याचे दुष्परिणाम त्याला जमिनीत दोन फूट खाली घालू शकत.आणि त्याच पद्धतीने वकील सुद्धा गुन्हेगारांना फाशी देऊन त्यांना वर पाठवतात अशाप्रकारे अतिशय मोजक्याच आणि अभ्यासू शैलीमद्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी प्रा.प्रमोद धुळे सर तसेच विद्यार्थ्यांनि दोन्ही सरांचे स्वागत केले.यावेळी गाडेकर मॅडम, शिवानी शेंदूरकर, हसीना मेश्राम,ईशा कळकुंबे,प्रज्ञा खेत्रे,कोमल नवगिरे इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment