राजधानीत बिरसा मुंडा जयंती साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 15 November 2022

राजधानीत बिरसा मुंडा जयंती साजरी

नवी दिल्ली दि. 15 :  उलगुलानकार बिरसा मुंडा यांची  जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.  

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी, सहायक निवासी आयुक्त (अ.का.) निलेश केदारे यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

महाराष्ट्र परिचय केंद्रात बिरसा मुंडा यांना अभिवादन


महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात आद्य क्रांतीवीर बिरसा मुंडा  यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक ( मा) (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.


No comments:

Post a Comment

Pages