प्रधानसांगवी येथे जनजागृती शिबिर संपन्न. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 13 November 2022

प्रधानसांगवी येथे जनजागृती शिबिर संपन्न.

किनवट,ददि.१३ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने प्रधानसांगवी(ता.किनवट)येथे आज(दि.१३) सकाळी ११ वाजता कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण शिबिर घेण्यात आले.

    अध्यक्षस्थानी दिवाणी व फौजदारी न्यायाधिश एस.बी.अंभोरे हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड.टी.एच.कुरेशी,अॅड.डी.एन.दराडे,वकील संघाचे माजी उपाध्यक्ष अॅड.मिलिंद सर्पे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सह दिवाणी व फौजदारी न्यायाधिश व्ही.जी.परवरे, गट विकास अधिकारी सुभाष धनवे,अॅड.राहुल सोनकांबळे यांनी विविध कायद्यांची थोडक्यात माहिती देऊन जनजागृती केली. सूत्रसंचालन अॅड.शामिले यांनी,तर आभार प्रदर्शन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस.के.तिरमनवार यांनी केले.

   यावेळी सरपंच संतोष गुहाडे,ग्रामसेवक के.डी.जाधव,लक्ष्मिकांत मुंडे, ज्ञानेश्वर गित्ते,रमेश राठोड, विठ्ठल किरवले यांच्यासह महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिबिराच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी एल.वाय.मिसलवार , न्यायालयीन पोलिस कर्मचारी, शिपाई जुब्बेरखान पठाण यांनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment

Pages