पेनूर येथील गोदावरी नदीपात्राला जिल्हाधिकाऱ्यांची रात्री अचानक भेट; अडगळीच्या जागी लावलेले 6 तराफे केले नष्ट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 15 November 2022

पेनूर येथील गोदावरी नदीपात्राला जिल्हाधिकाऱ्यांची रात्री अचानक भेट; अडगळीच्या जागी लावलेले 6 तराफे केले नष्ट

नांदेड  दि. 15 :- लोहा तालुक्यातील पेनूर येथे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अचानक भेट देऊन अवैध वाळू उपसा करणारे साहित्य नष्ट केले. गोदावरी नदीच्या पात्राला त्यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत अडचणीच्या ठिकाणी एकुण 6 तराफे लावलेले त्यांना आढळून आले. याबाबत संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी हे तराफे नष्ट करण्याच्या सूचना उपविभागीय दंडाधिकारी शरद मंडलिक यांना केल्या.

 

उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसिलदार व्यंकटेश मुंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले, मंडळ अधिकारी डी. एल. कटारे, तलाठी राजु इंगळे, रायाजी, मोतीराम पवार, मारोती कदम यांच्या पथकाने हे साहित्य नष्ट केले. सदर कारवाई रात्री 12 पर्यंत सुरू होती.

 


पेनूर व बेटसांगवी येथे होत असलेल्या अवैध रेती विरुद्ध जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यात मोठी कारवाई केली होती. अनेक तराफे नष्ट करून आलेला अवैध रेतीसाठा जप्त केला होता. या कारवाई पाठोपाठ जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आता रात्री अचानक भेट देऊन केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.


No comments:

Post a Comment

Pages