किनवट/प्रतिनिधी 23 : इंस्टाग्राम या सोशल मीडियावर gangster_lakhan007 (गँगस्टर लखन) या नावाच्या आयडी धारकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे विद्रूपीकरण, दैवीकरण करून अश्लील फोटो टाकून आक्षेपार्ह मजकूर टाकून आंबेडकर प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत या व्यक्तीवर कठोर कारवाई करून त्याचा तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन स्वाभिमानी युवा सेना च्या वतीने आज दिनांक 23 रोजी देण्यात आले.
जाती धर्मांध कुविचारी व्यक्ती गँगस्टर लखन याने जातीय द्वेष भावनेतून फोटोवर विद्रूपीकरण, दैवीकरण केले आहे. अशा मानसिकतेच्या व्यक्तीला कठोर शिक्षा करुन त्याची आयडी ब्लॉक करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे निवेदन स्वाभिमानी युवा सेनेचे तालुकाध्यक्ष सिध्दांत खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले आहे. निवेदनावर स्वाभिमानी युवा सेनेचे तालुका अध्यक्ष सिध्दांत खोब्रागडे, तालुका उपाध्यक्ष शिलरत्न पाटील, तालुका सचिव विपिन पवार, तालुका सहसचिव सुगत भरणे, तालुका कोषाध्यक्ष सुमित शेंद्रे, शहराध्यक्ष निवेदक कांनिंदे, रवी दिसलवर, सोनू टाक, सुबोध पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनाची प्रत सहाय्यक जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात देण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment