किनवट तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित थेट निवड होणार्‍या सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू ; 18 डिसेंबरला होणार मतदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 12 November 2022

किनवट तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित थेट निवड होणार्‍या सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू ; 18 डिसेंबरला होणार मतदान

किनवट,  (प्रतिनिधी) :  माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासह थेट सरपंच निवडीसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (दि.09) जाहीर केलेला असून, त्यात किनवट तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एकूण 405 ग्रामपंचायत सदस्य व थेट सरपंच निवडीसाठी 18 डिेसेंबर 2022 रोजी मतदान होणार असून, तालुक्यातील निवडणुकीच्या गावात इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झालेली आहे. तसेच गावपातळीवर राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचे असलेले सरपंचपद मिळविण्यासाठी अनेकांकडून मोर्चेबांधणी केली जाणार आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे.


       राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवार,दि.18 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय, किनवट व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर निवडणुकीची सूचना प्रसिद्ध केली जाईल. या निवडणुकीसाठी सोमवार 28 नोव्हेंबर ते शुक्रवार 02 डिसेंबर दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. नामनिर्देशनपत्र छाननी सोमवार,05 डिसेंबर 2022 रोजी सकाळी अकरापासून सुरू होईल. तसेच बुधवार 07 डिसेंबर रोजी दुपारी तीनपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी तीननंतर निवडणूक चिन्ह नेमून देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. आवश्यक असल्यास रविवार,18 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान घेतले जाईल. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसीलदारांनी निश्चित केलेल्या ठिकाणी 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 23 डिसेंबरपर्यंत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. किनवट तालुक्यात ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. ती ग्रामपंचायत व लगतची गावे इथे आचारसंहिता लागू असेल. शहरी भागात आचारसंहिता लागू नसली तरी ग्रामपंचायतीच्या मतदारांवर प्रभाव पडेल, अशा प्रकारची कोणतीही कृती अथवा भाष्य नागरी क्षेत्रात करता येणार नाही.


      किनवट तालुक्यातील मुदत संपलेल्या 53 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणारी गावे पुढील प्रमाणे : 1.आंजी 2.अंबाडी 3.अंबाडीतांडा 4.भीमपूर 5.भिलगाव 6.बुधवारपेठ 7.बेंदी 8.बेंदीतांडा 9.बेल्लोरी ज. 10.बेल्लोरी धा. 11.बोथ 12.भंडारवाडी 13.चिखली खु. 14.चिखली बु. 15.दहेली 16.दाभाडी 17.दरसांगवी सी. 18.दिगडी मंगाबोडी 19.दीपलानाईक तांडा 20.दुंड्रा 21.देवलानाईक तांडा 22. धामनदरी 23.धावजीनाईक तांडा 24.जरूर 25.जरूरतांडा 26.मरकागुडा 27.मलकजाम 28.मलकजाम तांडा 29.मार्लागुडा 30.मारेगाव खालचे 31.मारेगाव वरचे 32.माळकोल्हारी 33.मोहाडा 34.निराळा 35.नंदगाव 36.नंदगावतांडा 37.पळशी 38.पाटोदा खु. 39.पाटोदा बु. 40.पार्डी खु. 41.पार्डी सी. 42.पिंपरफोडी 43.पिंपरी 44.पांधरा 45.रोडानाईक तांडा 46.सक्रुनाईकतांडा 47.सारखणी 48.सालाईगुडा 49.शनिवारपेठ 50.तोटंबा 51.उणकदेव 52.वडोली 53.वाळकी बु..

No comments:

Post a Comment

Pages