नांदेडकर रसिक प्रेक्षकांना यंदा ऐकून १४ नाट्य प्रयोगांची मिळणार मेजवानी ; हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा पडदा उघडणार १५ नोव्हेंबर पासून - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 11 November 2022

नांदेडकर रसिक प्रेक्षकांना यंदा ऐकून १४ नाट्य प्रयोगांची मिळणार मेजवानी ; हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा पडदा उघडणार १५ नोव्हेंबर पासून

जयवर्धन भोसीकर

नांदेड- सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मंगळवार दि. १५ नोव्हेंबर पासून राज्यभरात सुरु होत आहे. नांदेडच्या कुसुम सभागृह येथे दि १५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता नांदेड विभागाची प्राथमिक फेरी रंगणार आहे. स्पर्धेसाठी सर्व सहभागी संस्थाना मा. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिले आहेत. नांदेडकर रसिक प्रेक्षकांना यंदा ऐकून १४ नाट्य प्रयोगांची मेजवानी मिळणार.


            ६१ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेसाठी यंदा नांदेड विभागासाठी नांदेड आणि परभणी मिळून एकूण १६ प्रवेशिका प्राप्त झाले होते. परंतु काही कारणास्तव दोन संस्थांनी प्रवेशिका रद्द केले असून १४ नाट्य प्रयोग पुढील प्रमाणे सादर होतील.


मंगळवार दि. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी, सिद्ध नागार्जुना मेडिकल असोसिएशन, नांदेडच्या वतीने अभिजित वाईकर लिखित, प्रमोद देशमुख दिग्दर्शित “नजरकैद” या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. बुधवार दि. १६ नोव्हेंबर रोजी ज्ञान संस्कृती सेवाभावी संस्था नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, भीमाशंकर निळेकर दिग्दर्शित “नरक चतुर्दशी”, गुरुवार दि.१७ नोव्हेंबर रोजी झपूर्झा फौंडेशन परभणीच्या वतीने विनोद डावरे लिखित, ऐश्वर्या डावरे दिग्दर्शित “चिरंजीव” शुक्रवार दि.१८ नोव्हेंबर रोजी जनजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, डोंगरगाव, नांदेडच्या वतीने आकाश भालेराव लिखित, दिग्दर्शित “नाच्याच लग्न”, शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, अनुजा डावरे दिग्दर्शित “दुसरा अंक” रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी पद्मावती कला अकॅडमी, नांदेडच्या वतीने गोविंद जोशी लिखित, दिग्दर्शित “स्पेस”, सोमवार दि. २१ नोव्हेंबर रोजी एम. एस. शिवणकर प्रतिष्ठान, परभणीच्या वतीने नारायण जाधव लिखित, सुनील ढवळे दिग्दर्शित “यशोधरा”, बुधवार दि. २३ नोव्हेंबर रोजी क्रांती हुतात्मा चॅरीटेबल ट्रस्ट परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, दिग्दर्शित “सृजन्मय सभा” गुरुवार दि. २४ नोव्हेंबर रोजी गोपाला फौंडेशन परभणीच्या वतीने अतुल साळवे लिखित, दिग्दर्शित “दानव”, शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर रोजी तन्मय ग्रुप नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित “घर”, शनिवार दि. २६ नोव्हेंबर रोजी धन्वंतरी ऑर्गनायझेशन परभणीच्या वतीने डॉ. अरुण जऱ्हाड लिखित, दिग्दर्शित “द अॅनॉमली”, रविवार दि. २७ नोव्हेंबर रोजी कल्चरल असोसिएशन नांदेडच्या वतीने प्रेमानंद गज्वी लिखित, राहुल जोंधळे दिग्दर्शित “तन-माजोरी” सोमवार दि. २८ नोव्हेंबर रोजी बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रीडा युवक मंडळ परभणीच्या वतीने डॉ. प्रसन्न शेंबेकर लिखित, मधुकर उमरीकर दिग्दर्शित “एक चॉकलेट प्रेमाच” मंगळवार दि. २९ नोव्हेंबर रोजी अभिनव भारत शिक्षण संस्था नांदेडच्या वतीने दिलीप परदेशी लिखित, मनीष देशपांडे दिग्दर्शित “काळोख देत हुंकार” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. तरी नांदेडकर रसिक प्रेक्षकांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहून कलावंताना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन नांदेड केंद्रावरील समन्वयक दिनेश कवडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages