महाराष्ट्राचे सुपूत्र न्या.डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांनी 50 वे सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 11 November 2022

महाराष्ट्राचे सुपूत्र न्या.डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांनी 50 वे सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ

नवी दिल्ली,: महाराष्ट्राचे सुपूत्र न्यायमूर्ती डॉ. धंनजय यशवंत चंद्रचूड यांनी  आज भारताचे 50 वे  सरन्यायाधीश  म्हणून  शपथ  घेतली.


        राष्ट्रपती  भवनाच्या दरबारहॉल मध्ये आयोजित विशेष समारंभात  राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी  न्या.चंद्रचूड यांना पद व  गोपनियतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगद‍ीप धनखड़, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा,  विधी व न्याय मंत्री किरेण रिज‍िजू यांच्यासह केंद्रीय मंत्री  माजी  सरन्यायाधीश उदय लळीत,  सर्वोच्च न्यायालयाचे तसेच उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


             सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यकाळ  8 नोव्हेंबर 2022 रोजी संपुष्टात आला. न्या. डॉ.डी.वाय. चंद्रचूड  आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळतील. सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ दोन वर्षांपर्यंत राहणार असून ते नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे. धनंजय चंद्रचूड हे दिवंगत माजी सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांचे सुपूत्र आहेत.

No comments:

Post a Comment

Pages