मंगेश कदम मित्र मंडळाकडून तरोडा भागातील विविध नगरामध्ये वाचन कट्टयाची सुरवात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 22 November 2022

मंगेश कदम मित्र मंडळाकडून तरोडा भागातील विविध नगरामध्ये वाचन कट्टयाची सुरवात

नांदेड, जयवर्धन भोसीकर : 

शहरातील तरोडा बू येथील विविध  भागात वाचन  कट्ट्याची आवश्यकता असल्याने त्या भागातील जेष्ठ नागरिक यांची मागणी लक्षात घेता येथील सर्व समाजातील नागरिकांसाठी मंगेश कदम मित्र मंडळाच्यावतीने विविध नगरामध्ये वाचन कट्याची सुरुवात करण्यात आली आहे.


 माजी पंचायत समिती सदस्य तथा महानगरपालिकेचे नगरसेवक प्रतिनिधी मंगेश कदम हे आपल्या समाजिक उपक्रमांमुळे संबंध जिल्ह्यात परिचित आहेत.कोरोनाच्या काळात गोरगरीब कुटूंबांना धान्य वाटप,रक्तदान शिबीर,अन्नदान,स्पर्धा परीक्षेचे पुस्तके वाटप,गरीब अनाथ कुटुंबियांना शिलाई मशीनचे वाटप,थंडीच्या दिवसात गरजू लोकांना ब्लॅंकेट वाटप याचबरोबर अनेक समाजिक उपक्रम मंगेश कदम हे राबवित असतात.

तरोडा बू.भागातील कांही जेष्ठ  नागरिकांनी या भागातील विविध नगरामध्ये वाचन कट्याची आवश्यकता असल्याचे कदम यांना सांगताच मंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने राहुल कॉलनी,दीपक नगर,दिलराज नगर,संतोष नगर,जेतवन नगर, कल्याणनगर,नालंदा नगर,रॉयल  फंक्शन हॉल समोर, साईबाबा मंदिर,शिवमंदिर अश्या जवळपास दहा ठिकाणी वाचन कट्याची सुरवात करण्यात् आली असून या वाचन कट्यात अग्रगण्य व विविध वृतमानपत्रे या भागातील नागरिकांना  वाचाय भेटतील अशी माहिती मंगेश कदम मित्र मंडळाकडून देण्यात आली.या सामाजिक उपक्रमा तरोडा (बू) भागातील नागरिकातून समाधान व्यक्त केले जात असून त्यांनी मंगेश कदम यांचे कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages