गोवर्धन बियाणी यांची नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 21 November 2022

गोवर्धन बियाणी यांची नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

                                                                      जयवर्धन भोसीकर नांदेड : जिल्हा पत्रकार संघाची मुदत संपल्याने विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असून विद्यमान कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली आहे..

 नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची मुदत चार वर्षांपुर्वीच संपली मात्र कोरोना आणि अन्य कारणांमुळे निवडणुका शक्य झाल्या नाहीत. त्यामुळे पत्रकार संघाच्या दैनंदिन कार्यात काहिसा विस्कळीतपणा आला होता... अशा स्थितीत अधिक वेळ घालविणे योग्य नसल्याने नांदेडमधील प्रमुख पदाधिकारयांशी चर्चा करून विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून गोवर्धन बियाणी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.. गोवर्धन बियाणी उद्या २२ नोव्हेंबर पासून आपल्या पदाची सूत्रे हाती घेतील.. ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी असेल.

गोवर्धन बियाणी यांनी सर्वांशी विचार विनिमय करून नवी कार्यकारिणी निवडावी अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे..एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी गोवर्धन बियाणी यांचं अभिनंदन केलं असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.गोवर्धन बियाणी हे दैनिक प्रजावाणीचे संपादक आहेत.

No comments:

Post a Comment

Pages