जयवर्धन भोसीकर
नांदेड, दि. 22 : शिक्षणक्रांतीचे आद्य जनक महात्मा जोतीराव फुले यांच्या निर्वाण दिनाच्या निमित्ताने २८ नोव्हेंबर रोजी आंबेडकरवादी मिशनमध्ये चर्चासत्र आयोजित कण्यात आले आहे. 'भारतात शिक्षण क्रांतीसाठी सामाजिक उपाय योजना' हा चर्चासत्राचा विषय आहे.
आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 'भारतात शिक्षण क्रांतीसाठी सामाजिक उपाय योजना' (Role of society in Education revolution) या विषयावर संपूर्ण देशांतील मान्यवरांचे विचार व त्यांच्या सूचना मागवण्यात येत आहेत. आपण या चर्चासत्रात सहभागी होऊन शिक्षण क्रांतीसाठी सामाजिक उपाय कोणते करावेत, यासंदर्भात आपली अभ्यासात्मक मांडणी करावी. प्रत्येक वक्त्यास दहा मिनिटांचा वेळ दिला जाईल. २८ नोव्हेंबर २०२२ महात्मा फुले यांच्या निर्वाणदिनी हे चर्चा सत्र आंबेडकरवादी मिशन सिडको नांदेड येथे दिवसभर चालणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत चर्चासत्र चालेल. या मध्ये विविध विचारवंतांच्या, समाज बांधवांच्या तरुण विद्याथ्र्यांचे आपले अभ्यासपूर्ण मते मांडतील. निवडक मते व उपायोजना प्रकाशित केल्या जातील. आंबेडकरवादी मिशन तर्फे पुढील २५ वर्षासाठी जी सामाजिक शैक्षणिक क्रांतीची उपायोजना दिली जाईल. यामध्ये आपल्या अमूल्य सूचना व मार्गदर्शनाचा समावेश केल्या जाईल. या चर्चासत्रात सहभागी होऊन आपली मते लेखी स्वरुपात सादर करावीत, असे आवाहन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले आहे. तसेच या चर्चा सत्रात सहभागी होणे शक्य नसल्यास पोस्टाने किंवा ईमेल (asrc.deepak@yahoo.co.in) द्वारे आपली मते आंबेडकरवादी मिशन, डॉ. आंबेडकर कॉर्नर, सिडको, नवीन नांदेड या मिशनच्या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले आहे._
No comments:
Post a Comment