नांदेड (प्रतिनीधी ) : भारतात वर्षातील नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी दि 20 नोव्हेंबर 2022 रोजी रस्ते अपघातातील मृत्यू पावलेल्या नागरीकांचा स्मरण दिन World day Remember Road traffic victims म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड,रस्ता सुरक्षा समिती नांदेड व फकिरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती बसस्थानक नांदेड व माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे साजरा करण्यात आला असुन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांच्या हस्ते रस्ते अपघातातील मृत व्यक्तींच्या स्मृतीस मेणबत्ती प्रज्वलित करून रस्ता सूरक्षा शपथ घेवून सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली.त्यानंतर कलापथकांनी आपल्या पथनाट्यातून बाहेरगावी गेलेल्या दुचाकीस्वारा सोबत मुलांनी फोनवर साधलेला संवाद,व थोड्या वेळांने दुचाकीस्वाराचा हेल्मेट न वापरल्यामुळे रस्ता अपघातात मृत्यू होतो आणि घरी प्रत्यक्ष वडिलांचे प्रेत आल्यावर कुंटूबियांचा हंबरडा होतो असे पथनाट्यातुन सादर करून लोकांना हेल्मेटचे महत्व पटवून देण्यात आले.
रस्ता अपघातातील मृत व्यक्तीच्या स्मरण दिनानिमित्त भारतात दरवर्षी दिड लाख लोकांचा मृत्यू होतो.त्यामुळे रस्त्यावर वाहने चालवताना रस्ता सुरक्षा नियमावलीचे पालन करावे,रस्त्यावय अपघात झाल्यास त्यांना मदत करून हॉस्पिटलमध्ये घेवून जाण्यासाठी जिवनदुत मोठ्या प्रमाणात निर्माण व्हावेत,असे आवाहन यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले.यावेळी अविनाश राऊत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी), मंगेश इंगळे,अमोल आव्हाड,मनोज चव्हाण,रत्नाकांत ढोबळे,किशोर भोसले,धोडींबा आव्हाड,अमोल सोमदे,अनिल सिळेकर,भुषण राठोड,स्वप्निल राजुरकर,प्रविण रहाणे,माणिक कोरे,केशव जावळे,निलेश ठाकूर,तेजस्विनी कलाळे,श्रावण जाधव,कपिल जोंधळे,राम कर्णे,तिडके,वाय.एच खान बसस्थानक प्रमुख नांदेड ए.व्ही. भिसे (वाहतूक निरिक्षक),आर.एस.निळेकर,अनिल श्रीवास्तव (वाहतुक निरीक्षक ट्राफीक शाखा नांदेड) ,आदी विभागाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कलापथक प्रमुख माधव वाघमारे,मुख्य गायीका सविताताई गोदाम,तबलावादक अधिराज वाघमारे,हार्मोनियमवादक सुरज गायकवाड,सहकलाकार दत्ता पोटलेवाड,पांडूरंग हापसेवाड,प्रविण मल्लेवार,सिमा जाधव आदी कलाकार परिश्रम घेत आहेत.तसेच आपल्या कलेच्या माध्यमातून चित्तथरारक प्रसंग दाखवून नागरीकांची हेलावून टाकत आहेत,तर रस्ता सुरक्षा अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फकिरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष संतोष तेलंग,सचिव साईप्रसाद जळपतराव, सदस्य सचिन वाघमारे,बाळासाहेब टिकेकर आदी पदाधिकारी नांदेड जिल्ह्यातील संपुर्ण तालुक्यात नियोजनबद्ध रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत.
No comments:
Post a Comment