रस्ता सुरक्षा काळाची गरज नव्हे तर जिवनाची गरज आहे - संदिप निमसे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 20 November 2022

रस्ता सुरक्षा काळाची गरज नव्हे तर जिवनाची गरज आहे - संदिप निमसे

   नांदेड (प्रतिनिधी) : रस्ता सुरक्षा ही आपल्या देशातील अतीशय संवेदनशील व काळजी करायला लावणारी बाब आहे.देशातील एका वर्षातील अंदाजे एक लाखाच्यावर संख्या आहे.त्यामुळे रस्ता सुरक्षा अभियान काळाची गरज नव्हे तर जिवनाची गरज आहे असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संदिप निमसे यांनी केले.

    प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व फकिरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बळीरामपूर नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कंधार येथील रस्ता सुरक्षा नियमावली बाबत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.महाविद्यालयातील विध्यार्थी,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना मोटार वाहन निरिक्षक संदिप निमसे  पुढे म्हणाले की,रस्ते अपघातात निष्काळजीपणा ,वाहनातील नादुरुस्ती,आणि वाहतुक सुरक्षा नियमावलीची पायमल्ली या प्रमुख कारणाबरोबरच वाहनांचा बेभान वेग,अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालवल्यामुळे मोठमोठे अपघात घडत आहेत.कित्येक निष्पाप व्यक्तींना कोणतेही कारण नसतांना आपला जीव गमवावा लागत आहे म्हणून प्रत्येकांने प्रत्येकांचे जिवन सुंदर आहे,तुम्हाला तुमच्यासाठी आणि कुटूंबासाठी जगायचे असेल तर रस्ता सुरक्षा नियमावलीचे पालन करावे असे आवाहन महाविद्यालयीन विध्यार्थी,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना केले.या रस्ता सुरक्षा नियमावली बाबत मार्गदर्शन शिबीरासाठी मोटार वाहन निरिक्षक निलेश चौधरी,गवळी, प्राचार्य डॉक्टर सावंत,आदीची प्रमुख उपस्थिती होती,तर महाविद्यालयातील विध्यार्थी,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 

 डॉ गुट्टे यांनी केले तर  प्रास्ताविक फकिरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सदस्य बाळासाहेब टिकेकर,तर आभारप्रगटन फकिरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सदस्य सचिन वाघमारे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages