संविधानस्तंभ परिसरातील अतिक्रमण कायमस्वरूपी हटवावे ; स्वाभीमानी युवा सेनेची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 17 November 2022

संविधानस्तंभ परिसरातील अतिक्रमण कायमस्वरूपी हटवावे ; स्वाभीमानी युवा सेनेची मागणी

किनवट/प्रतिनिधी, दि.16 : किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात व जुन्या नगर परिषदे समोर असलेल्या संविधान स्तंभाची अवस्था जीर्ण झाली असुन, भोवताली असलेले लोखंडी कंपाऊंड गंजून गेले आहे. संविधान स्तंभ परिसरात दिवसा भेलपुरी, आईस्क्रिम, कटलरी, कपड्याच्या दुकानाचे गाडे व्यापारी लावत असतात. संविधान स्तंभाच्या आजूबाजूला छोट्या मोठ्या व्यापार्‍यांनी अतिक्रमणामुळे या परिसरात घान व कचरा होत आहे.  संविधान स्तंभाच्या आजूबाजूस केलेले अतिक्रमण तात्काळ कायमस्वरुपी हटविण्यात यावे व नगर परिषदे च्या वतीने रंगरंगोटी करून सुशोभीकरण करावे अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी युवा सेना, किनवटचे तालुकाध्यक्ष सिध्दांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात किनवट नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांनी निवेदन स्विकारले.  

     दि.26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे. त्या निमित्ताने या दिवशी कार्यक्रम आयोजित केल्या जातो. संविधान प्रस्तविकेचे सामूहिक वाचन घेण्यात येणार आहे. तसेच संविधान रॅलीचा समारोपही येथेच होणार आहे. येथे जमलेल्या संविधान प्रेमी नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी तेथील अतिक्रमण कायमस्वरुपी हटविण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

     निवेदनावर स्वाभिमानी युवा सेनेचे तालुका अध्यक्ष सिद्धांत खोब्रागडे, तालुका उपाध्यक्ष शिलरत्न पाटील, तालुका सचिव विपीन पवार, तालुका सहसचिव सुगत भरणे, तालुका कोषाध्यक्ष सुमित शेंद्रे, शहराध्यक्ष निवेदक कानिंदे, मंगेश कानिंदे, प्रथमेश रत्नमानके यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. निवेदनाच्या प्रती सहायक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट व पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन किनवट येथे देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages