संज्योत गुंजकर हिचे नीटच्या परिक्षेत यश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 3 November 2022

संज्योत गुंजकर हिचे नीटच्या परिक्षेत यश

किनवट, दि.03(प्रतिनिधी) :   येथील शंकरराव चव्हाण सहकार बँकेचे व्यवस्थापक प्रकाश गुंजकर यांची कन्या संज्योत हिने नीट परिक्षेत घवघवीत यश संपादित केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


         वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच फेरीत कु.संज्योत हिने खुल्या प्रवर्गातून नीट परिक्षेत 513 मार्क मिळविले असून, तिला नाशिक येथील एस.एम.बी.टी.वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालेला आहे. शालेय स्तरापासूनच तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे तिने कठोर परिश्रम घेत अखेर स्वत:सह आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार केले आहे. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल माजी नगराध्यक्ष के.मूर्ती, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस गिरीश नेम्मानीवार, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशन भोयर, ज्येष्ठ पत्रकार फुलाजी गरड, बापुसाहेब तुप्पेकर, प्रमोद पहुरकर यांनी  तिच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देत, पेढे भरवीत अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Pages