बार्टी संस्थेत विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहाने साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 8 November 2022

बार्टी संस्थेत विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहाने साजरापुणे दि.  ७  प्रतिनिधी :

          डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,  बार्टी,  पुणे संस्थेचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली ७ नोव्हेंबर  हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन , विद्यार्थी दिन  संपूर्ण महाराष्ट्रात  विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात आला.

 दिनांक ७ नोव्हेबर २०२२ रोजी मा. महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये यांनी विद्यार्थी दिनानिमित्त सातारा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तसेच  बार्टी आयोजित विद्यार्थी रॅलित सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेबर १९०० रोजी प्रतापसिंह हायस्कूल राजवाडा,  सातारा येथिल शाळेत इयत्ता पहिलीच्या  वर्गात प्रवेश घेतला  अशा ऐतिहासिक शाळेस भेट देऊन  शाळा प्रवेश दिन कार्यक्रमात सहभागी झाले.  

 यावेळी श्री उमेश सोनवणे उपायुक्त तथा विभाग प्रमुख बार्टी, श्रीमती सुनंदा गायकवाड, प्रकल्प अधिकारी मुख्यालय  ,  समतादुत विभाग  , श्री दिलीप वसावे, प्रकल्प अधिकारी समतादुत विभाग सातारा,  यांच्यासह सर्व समतादुत आदी उपस्थित होते.


पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व बार्टी मुख्यालयातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास श्रीमती स्नेहल पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा विभागप्रमुख बार्टी, श्रीमती प्रज्ञा मोहिते कार्यालयीन अधीक्षक, श्रीमती संध्या नारखडे,  कार्यालयीन अधीक्षक, श्री सचिन जगदाळे कार्यालयीन अधीक्षक, श्री रितेश गोंडाणे कार्यालयीन अधीक्षक,  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ग्रंथालयातील विद्यार्थी श्री अक्षय बर्वे, डॉ अंकुश गायकवाड,   सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक,  श्री विशाल शेवाळे, डॉ सारिका थोरात, प्रकल्प व्यवस्थापक,  यांनी मनोगत व्यक्त केले.

श्रीमती रजनी वाघ, जनसंपर्क अधिकारी , यांची संयुक्त राष्ट , युनोच्या वतिने ईजिप्त या देशात आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा श्रीमती प्रज्ञा मोहिते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यार्थी दिनानिमित्त बार्टी ग्रंथालयातिल स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

श्रीमती सुभागी सुतार,  प्रकल्प व्यवस्थापक , डॉ प्रेम हनवंते, प्रकल्प व्यवस्थापक , डॉ संभाजी बिराजे,  सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, श्री नरेश गोठे, यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रस्ताविक सुत्रसंचलन प्रकाशन व प्रसिद्धी विभागाचे श्री रामदास लोखंडे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages