मुंबई :
अभिनेता मयुरेश पेम आणि अभिनेत्री नम्रता गायकवाड ही नवी जोडी "गैरी" या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदिवासींच्या समस्या "गैरी" या चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत. दमदार स्टारकास्ट असलेला हा चित्रपट येत्या १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.
द्विजराज फिल्म्स आणि युक्ता प्रॉडक्शन्सच्या प्रवीण बालाप्रसादजी बियाणी, दत्तात्रय जाधव यांची निर्मिती असलेल्या "गैरी" या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन पांडुरंग बाबूराव जाधव यांनी केलं आहे. मयूरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड आणि देविका दफ्तरदार यांच्या चित्रपटांत भूमिका आहेत. गुरु ठाकूर आणि विष्णु थोरे यांनी गीतलेखन, अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन, फुलवा खामकर यानी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. वैशाली सामंत, अमितराज, मधुरा कुंभार, हृषिकेश शेलार यांनी गाणी गायली आहेत. तर पार्श्व संगीत आणि संगीत मयूरेश केळकर यांचं आहे. विनोद पाटील यांचं छायालेखन आहे.
आदिवासी समाजातील एका डॉक्टर होऊ पाहणाऱ्या तरुणाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या समस्या "गैरी" हा चित्रपट मांडतो. सकस कथा, दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रेक्षक, अभ्यासकांसह सर्वांनाच आहे.
No comments:
Post a Comment