सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी नेहा भोसले(भा.प्र.से.) रुजू - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 7 November 2022

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी नेहा भोसले(भा.प्र.से.) रुजू

किनवट,ता.७(बातमीदार):  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी म्हणून  आणि किनवट उपविभागीय कार्यालयाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आज(ता.७)नेहा भोसले ह्या रुजू झाल्या.दरम्यान, गट विकास अधिका-यांसह अनेक कार्यालय प्रमुखांनी नेहा भोसले यांच्या स्वागतासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आज आप-आपले कार्यालय वा-यावरसोडून हजेरी लावली,यामुळे.  तालुका स्तरावर असलेल्या कार्यालयात कामासाठी  आलेल्या ग्रामिण आदिवासी जनतेला नहाक माणसिक त्रास सोसावा लागला व आपला वेळही वाया घालवावा लागला.

    किनवट व माहूर या आदीवासी तालुक्याचा विकासाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भाटगिरी करणा-या अधिकारी व पदाधिका-यांशी योग्य अंतर ठेवून काम करणे,हे नेहा भोसले यांच्यासाठी एक आवाहानच असेल.या अहवानाशी  त्या कश्या सामना करतील हे येत्या काळात दिसून येईलच.

No comments:

Post a Comment

Pages