5 तासात 50 ग्रामपंचायतीची मतमोजणी 12 टेबलवर 13 फेऱ्यात सुव्यवस्थित पार पडली - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 20 December 2022

5 तासात 50 ग्रामपंचायतीची मतमोजणी 12 टेबलवर 13 फेऱ्यात सुव्यवस्थित पार पडली

किनवट : येथील तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात स्थापित मतमोजणी कक्षात तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक 2022 ची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी (ता.20) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शांततेत सुव्यवस्थितपणे पार पडली.


          सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी नेहा भोसले (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी मतमोजणीचे सुरेख नियोजन केले होते. त्यांच्या कक्षाकरिता नियुक्त अव्वल कारकून अशोक कांबळे, मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे, मल्लिकार्जून स्वामी, नितीन शिंदे, संदीप पाटील, वाय.एम. देवकते, वाय.बी. इनामदार यांनी मतमोजणीसाठी प्रभावीपणे आपापली भूमिका पार पाडली. 

       निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार मोहम्मद रफीक यांच्या नेतृत्वात व्ही.टी. सूर्यवंशी, एन.जी. कानगुले, विश्वास फड यांनी स्ट्रॉंगरूम मधून मतमोजणीकरिता 146 नियंत्रण संच व 193 मतदान संच उपलब्ध करून दिले होते. नायब तहसिलदार अनिता कोलगणे यांच्या नेतृत्वात 12 टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक व सहायक यांनी मास्टर ट्रेनर यांच्या साथीने मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली. मंडळ अधिकारी एम. डी. वांगीकर व दाऊदखान हे रोऑफिसर मतमोजणी पर्यवेक्षकांकडून मत मोजणी निकाल भाग 2 निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे पोहविला. 


          यातील विजयी सरपंच गावनिहाय पुढील प्रमाणे : गाव : विजयी सरपंच ;

अंबाडी : जाधव शितल गिरीराज, भीमपुर : आत्राम सिताबाई किशन, बेंदी तांडा : पेंदोर अंजनाबाई मनोहर , दिगडी (मं) : किनाके नलिनी अविनाश, दाभाडी : डुडुळे अनिल श्यामराव, धामनदरी : आतराम परसराम भीमा, पार्डी (खु ): जेवलेवाड नारायण वाघजी , मरकागुडा : गाताळे सविता उमाजी , चिखली (बु ): तुमराम हसन देवराव, बेंदी : बुरकुले शोभा सुभाष ,चिखली खु : वाळके राजू विठ्ठलराव , वडोली : वेट्टी कमलदास माधव , मारेगाव (वरचे ) : आतराम मारोती मनोहर

भंडारवाडी : गादेवार अभिमन्यु संभाजी, अंबाडी तांडा :जाधव जोत्सना कैलाश, आंजी : चिबडे कैलास खंडुजी, पाटोदा( बु ) : उईके वेदिका गणेश, दहेली :कोटनाके वनीता संतोष , सलाईगुडा : आत्राम प्रकाश मारोती, मार्लागुंडा : राठोड अर्चना देविदास , नंदगाव : भडंगे युवराज मारोती, पाटोदा (खु) :धुमाळे सुनिता दत्ता,  रोडानाईक तांडा : राठोड शोभाबाई प्रकाश, बेल्लोरी (ज) : जावळे संगीता सिताराम , उनकदेव :गेडाम पुंडलिक रामा, पिंपरफोडी : शिवाजी माधव शेळके, जरुर : कुमरे पृथ्वीराज यशवंत, धावजी नाईकतांडा (दहेलीतांडा ) : तोडसाम मनीषा जयवंत, दिपला नाईक तांडा : आडे शेषाबाई रामराव, मलकजाम : पोगुलवार सुनिता सत्यनारायण, मलकजाम तांडा : आडे कपिल देवराव, नंदगाव तांडा : जाधव देविदास मोहन, पार्डी (सी) : कुमरे अनुसया शंकर, देवला नाईक तांडा : डोईफोडे फुलाबाई मारोती, पांधरा : कऱ्हाळे दत्ता परसराम ,जरूर तांडा : चव्हाण प्रकाश कुवरसिंग , बेल्लोरी (धा ) : गारोळे अनिता परमेश्वर, दरसांगवी (सी ) : कनाके शशांक सुभाष, मारेगाव (खा) : कोकाटे अश्विनी संतोष , पळशी : नैताम मंगला रामचरण, सारखणी : सिडाम सूर्यभान जंगम, माळकोल्हारी : कोकाटे तुकाराम हरी, दुंड्रा :दोनकलवार प्रियंका सतीश,  बोथ : कोवे राजाराम देवेशा, निराळा :दिलीप माधव कनाके, पिंपरी : तोरकड दिगांबर सुदाम, वाळकी (बु) : चव्हाण सुनिता बळीराम, तोटंबा :राठोड स्वप्नील तानाजी,  भिलगाव : मंगाम रेशमा रवींद्र, मोहाडा : पवार सुनिता दुर्गासिंग , शनिवारपेठ : किरवले वत्सला खंडू (अविरोध) , बुधवारपेठ : कुडमेते विजया वसंतराव (अविरोध )

          उप विभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांनी मतमोजणी करिता चोख पोलिस बंदोबस्त लावला होता.


बेल्लोरी (ज), पिंपरफोडी व नंदगावतांडा ग्रामपंचायतीच्या एक प्रभागातील सदस्यांकरिता समान मते पडल्याने आनंदी योगेश वैद्य या बालिकेच्या हस्ते चिठ्ठी काढून विजयी उमेदवार जाहीर केले.

No comments:

Post a Comment

Pages