किनवट : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय नांदेड दवारा आयोजित किनवट तालुका स्तर शालेय स्पर्धा क्रीडा संकुल मैदान किनवट येथे खेळीमेळीच्या वातावरणात यशस्विरीत्या पार पाडल्या. या तालुकास्तरीय स्पर्धेत एकुण दहा खेळांचा समावेश होता त्यामध्ये मैदानी, कबडडी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, तायक्वाँदो, कुस्ती, बॅडमिंटन , योगासन वरील स्पर्धा क्रीडा समिती, किनवट यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा संयोजक श्री. प्रा. तांदळे पी.जे. सर तसेच श्री. मुकुंद तिरमनवार सर यांनी व्यवस्थितरीत्या नियोजन करून खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडल्या.
03 डिसे. 2022 रोजी बॅडमिंटन व तायक्वाँदो या खेळापासून तालुका स्तरीय स्पर्धेला सुरवात झाली. या स्पर्धेचे उदघाटन श्री. महामुनी साहेब, गटशिक्षणाधिकारी, पं.स. कार्यालय किनवट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले आणि 20 डिसे. 2022 रोजी कबडडी सर्व गट क्रीडा स्पर्धाची सांगता झाली. या कबडडी स्पर्धेच्या प्रसंगी श्री. महामुनी साहेब गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्याचे मनोबल वाढविण्याच्या उददेशाने खास स्पर्धा पाहण्यासाठी हजेरी लावली. या सर्व स्पर्धा क्रीडा समिती किनवटच्या अध्यक्ष मा. मृणाल जाधव मॅडम, तहसिलदार किनवट यांच्या व तालुका क्रीडा अधिकारी श्री. गुरूदिपसिंग संदु सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. प्रा. तांदळे पी.जे. सर, किनवट तालुका संयोजक तसेच त्यांनी टिम श्री. मुकुंत तिरमनवार सर, श्री. पठाण जुम्मााान सर, श्री. संदिप ईसाई, श्री. सय्यद फरहान सर, श्री. तुकाराज जाधव सर, श्री. करण मुंडे सर, श्री. रामराव राठोड सर, श्री. सुर्यवंशी सर, श्री. अनवर चव्हाण सर,श्री .रहेमान सर श्री. इंद्रसिंग राठोड, श्री. राजु मेंडके, श्री. आशिष तामगाडगे यांनी क्रीडा स्पर्धा यशस्वी पार पाडण्यात महत्वाची भुमिका निभावली. त्यामुळे क्रीडा संयोजक श्री. तांदळे पी.जे. सरांनी सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment