किनवट,ता.२७(बातमीदार): प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण बैठक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे व जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.यात कार्यकारिणीची निवड करण्यात आली.ती अशी; अध्यक्ष- नसीर तगाले, कार्याध्यक्ष- सय्यद नदीम, सचिव- राजेश पाटील, सहसचिव- शेख आतिफ, उपाध्यक्ष गंगाधर कदम व बाबूराव वावळे. कोषाध्यक्ष- प्रज्वल कारले, सह कोषाध्यक्ष- इंद्रपाल कांबळे, संघटक- विनोद पवार, विशाल भालेराव,रावसाहेब कदम व जितेंद्र चव्हाण, सदस्य- शुभम शिंदे ,सय्यद गौस, अमर सुरोशे, अकबर खान, रेहान खान.तसेच कायदेविषयक सल्लागार म्हणून पत्रकार एड. जी.एस. रायबोळे व एड. विलास सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ची युवा तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली. अध्यक्ष- प्रणय कोवे, उपाध्यक्ष विशाल गिमेकर व सुहास मुंडे, सचिव- मारोती देवकते, कोषाध्यक्ष- चंद्रकांत कागणे, तालुका प्रसिद्धीप्रमुख- रमेश परचाके यांची निवड करण्यात आली.
No comments:
Post a Comment