अन्यथा उर्वरित सेवेत देशहित जपणारे विद्यार्थी घडवावेत - गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 30 December 2022

अन्यथा उर्वरित सेवेत देशहित जपणारे विद्यार्थी घडवावेत - गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने

किनवट. दि. 29 (प्रतिनिधी) : आपल्या शिक्षकीपेशामध्ये आपल्या हातून किती विद्यार्थी घडले यांचा लेखा-जोखा तयार करावा आणि नसतील तर उर्वरीत सेवेतून देशाला विकासाच्या उंचीवर नेणारे विद्यार्थी घडविण्यात आपलं जीवन वेचावे, असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी केले.


    मथुरा लमाण समाजाचा देशातील एकमेव गुरुद्वारा असलेल्या चंद्रपूर येथील जि.प. प्राथमिक शाळेत आयोजित संकुल थाराच्या केंद्रीय शिक्षण परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर गुरुद्वाराचे महंत गुलाबसिंग महाराज साबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून मानव विकास कार्यक्रमाचे समन्वयक उत्तम कानिंदे, मारेगाव (व) केंद्राचे केंद्र प्रमुख रमेश खुपसे हे उपस्थित होते. याप्रसंगी ‘महामानव वाणी प्रबोधन गाणी’ गीतसंग्रहाचे गीतकार शंकर सोनकांबळे व माहिती दर्शिका निर्मिती गटाच्या सदस्या राणी नेम्मानीवार यांचा सत्कार करण्यात आला.


     महापुरुषांच्या प्रतिमा पूजनानंतर साहेबराव डोंगरे यांनी स्वागत गीत गाईले. प्रास्तविक केंद्र प्रमुख बाळासाहेब कदम यांनी तर सूत्रसंचालन दिलीप सोळंके यांनी केले. रेणुका पतपेढीचे चेअरमन सुधाकर दहिफळे, मुख्याध्यापक सुभाष न्यालमवार, शिक्षक गजानन जमादार यांनी मान्यवरांचे स्वागत केले व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.


      यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उत्तम लोखंडे, मनोहर मडावी, माजी उपसरपंच रामराव कातले, मुख्याध्यापक दिलीप इंगळे, किशन डोंगरे, पांडुरंग सातपुते, विनोद पांचाळ, एस.आर. केंद्रे, अरुण डवरे, एस.व्ही. राठोड, त्र्यंबक साबळे, प्रभाकर जमादार, पांडुरंग खरोडे, उत्तम खसावत, व्ही.ए .शेर्लावार, यू. टी. जाधव, डी. एस. येरवाळ, सुलभक बोरकर, सुधाकर भरणे, आर. बी. बैलके यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages