जयभीम हा शोषितांच्या क्रांतीचा नारा मक्रनपूर परिषदेच्या वर्धापनदिनी भडकलगेट गेट येथे 'जय भीम डे' साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 30 December 2022

जयभीम हा शोषितांच्या क्रांतीचा नारा मक्रनपूर परिषदेच्या वर्धापनदिनी भडकलगेट गेट येथे 'जय भीम डे' साजरा

औरंगाबाद दि.३० निजाम राजवटीने बाबासाहेबांना मराठवाड्यात सभा घेण्यास घातलेली बंदी झुगारून मक्रनपूर येथे पार पडलेल्या परिषदेने मराठवाड्यातील समतेच्या लढ्याचे रणशिंग फुंकले आणि जयभीम चा जयघोष जगभरात गेला आज जयभीम हे अभिवादन शोषितांच्या क्रांतीचा नारा झाला आहे.

असे प्रतिपादन श्रावण गायकवाड यांनी मक्रनपूर परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त भडकलगेट येथे आयोजित जयभीम डे सेलिब्रेशन मध्ये केले.

रिपब्लिकन विद्यार्थी सेना व मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ह्यावेळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व मक्रनपूर परिषदेचे संयोजक स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब मोरे यांना अभिवादन करण्यात आले.

ह्यावेळी मिठाई वाटप करून निळ्या रंगाचे फुगे हवेत सोडून जयभीम च्या गगनभेदी घोषणा देत जल्लोष करण्यात आला.

यावेळी श्रावण गायकवाड, राजू आमराव, सुशीला खडसे, विलास जगताप, आयोजक सचिन निकम, काकासाहेब गायकवाड, मनोज वाहुळ, राहुल वडमारे, सिद्धार्थ सदाशिवे, अविनाश कांबळे, गुणरत्न सोनवणे, अतुल कांबळे, उमाकांत खोतकर, नितीन दाणे, नवल सूर्यवंशी, देवा त्रिभुवन, विकास रोडे, पवन पवार,संदिप अहिरे, संतोष ससाणे, सम्यक सरपे, निलेश वाघमारे, विश्वजित गायकवाड, मनीष नरवडे, कपिल बनकर, सचिन शिंगाडे, किशोर ससाणे आदींची उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment

Pages