किनवट पालिकेत सोमवारपासून येणार ‘प्रशासक राज’ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 7 January 2023

किनवट पालिकेत सोमवारपासून येणार ‘प्रशासक राज’

 किनवट  : येथील पालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्यासह उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा 5 वर्षांचा कार्यकाळ येत्या 8 जानेवारीला संपत आहे. यामुळे दि.9 जाने.पासून पालिकेत प्रशासकराज येणार आहे.                                                         


      किनवट नगरपालिकेच्या थेट जनतेतून नगराध्यक्षासह नगरसेवकांच्या जागा निवडीसाठी दि.13 डिसेंबर 2017 रोजी सार्वत्रिक निवडणूक झाली. परंतु, प्रशासकीय सोपस्कारानंतर नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा दि.9 जानेवारी 2018 रोजी झाली. मच्छेवार यांच्या 5 वर्षांच्या अध्यक्षपदाच्याकाळात भाजपने उपनगराध्यक्षपदावर श्रीनिवास नेम्मानीवार, अजय चाडावार व व्यंकट नेम्मानीवार यांना संधी दिली. विद्यमान नगराध्यक्ष व पदाधिकारी, नगरसेवकांचा पंचवार्षिक कार्यकाळ संपत असतानाच, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दि.15 डिसेंबर रोजी राज्यातील 12 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याबाबत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र दिले आहे. राज्यातील एकूण 16 पालिका, पंचायतींपैकी नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या नगर पालिकेचाही यात समावेश आहे. दरम्यान,राज्यातील 21 नगर परिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम, मतदार यादी कार्यक्रम व त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सदर प्रक्रिया पार पाडण्यासाठी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीसाठी पालिकेत प्रशासक राज राहाणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages