विश्व बौद्ध धम्मध्वज दिनानिमित्त धम्म रॅली चे आयोजन १०० फुटी बौद्ध धम्म ध्वजाचे आकर्षण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 7 January 2023

विश्व बौद्ध धम्मध्वज दिनानिमित्त धम्म रॅली चे आयोजन १०० फुटी बौद्ध धम्म ध्वजाचे आकर्षण

औरंगाबाद:

जगभरात दि.८ जानेवारी हा दिवस विश्व बौद्ध धम्मध्वज दिन म्हणून साजरा करण्यात येतो यंदा प्रथमच महाराष्ट्रात औरंगाबाद येथे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून विद्यापीठ गेट ते बौद्ध लेणी अशी १०० फुटी बौद्ध धम्म ध्वजाची भव्य गौरव रॅली मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन व उपसकांच्या वतीने काढण्यात येणार आहे.

रॅलीमध्ये शुभ्र बुद्ध मूर्ती,बौद्ध भिख्खू,बौद्ध तत्वज्ञानाचा गौरव करणारे फलक व शुभ्र वस्त्रातील धम्म उपासक व 100 फुटी बौद्धधम्म ध्वज असणार आहे.

   धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौध्दांचे एकच प्रतीक असावे , या विचाराने सन १८८० मध्ये श्रीलंकेचे अनागारिक देवमित्र धम्मपाल , महास्थविर गुणानंद , सुमंगल , बौध्द विव्दान जी . आर. डिसिल्वा इत्यादिनी मिळून निळा , पिवळा , लाल , पांढरा व केसरी अशा पाच रंगाच्या उभ्या व आडव्या पट्ट्यामध्ये ' विश्व बौध्द ध्वजा ' ची निर्मिती केली आहे . कालांतराने त्याला विश्व मान्यता प्राप्त झाली . याला पाली भाषेत ' षडरोशनी ध्वज ' किंवा ' धम्म ध्वज ' असे म्हणतात .

ह्या रॅली मध्ये बौद्ध भिक्खू,उपासक,विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक सचिन निकम,पू.भन्ते नागसेन बोधी थेरो,गुणरत्न सोनवणे,अविनाश कांबळे, राहुल वडमारे,अतुल कांबळे, आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages