नांदेड दि.७-तिरंगानगर तरोडा खुर्द येथे पौष पौर्णिमा (पुस्सो) उत्साहात साजरी करण्यात आली.आयु.बी.सी.गोणारकर यांनी आदरातिथ्य केले.प्राचार्या संघमित्रा गायकवाड सावित्रीबाई फुले बीएड काॅलेज सिडको,माजी गट शिक्षणाधिकारी टि.डी. गायकवाड यांनी धम्मदेशना दिली.उपासक रामचंद्र देठे, कैलास धुतराज, गौतम पोहरे यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी हरी फुलवरे, विरेंद्र भगत एस.जे शिरसे विष्णू सोनवणे,शिवराज गोणारकर यांचेसह बहुसंख्य उपासिकांची हजेरी होती.इ.स.पू.५२७ च्या पौष पौर्णिमेस मगध राजा बिंबीसार यांनी उपासकाची दीक्षा ग्रहण केली होती.
तथागथ गौतम बुद्धांनी आपल्या संपूर्ण जिवनात सर्व १२ पौर्णिमांना महत्त्व दिल्याने तिरंगानगरातील दर एका उपासकाच्या निवासी फिरती पौर्णिमा साजरी केली जात असल्याचे मुख्यप्रवर्तक रामचंद्र देठे यांनी सांगितले.
 


 
 
 
 
 
 
 
 
 
No comments:
Post a Comment