विहीरीत पडलेल्या अस्वलाला सात तासाच्या प्रयत्नाने वन कर्मचाऱ्यांनी सुखरुप बाहेर काढले व पैनगंगा अभयारण्यात सोडले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 30 January 2023

विहीरीत पडलेल्या अस्वलाला सात तासाच्या प्रयत्नाने वन कर्मचाऱ्यांनी सुखरुप बाहेर काढले व पैनगंगा अभयारण्यात सोडले

किनवट,ता.३०(बातमीदार): विहिरीत पडलेल्या अस्वलाला सात तासाच्या प्रयत्नाने वन कर्मचाऱ्यांनी सुखरुप बाहेर काढले व पैनगंगा अभयारण्यात अस्वलास सोडले, अशी  माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एल.राठोड यांनी दिली.ही घटना काल (ता.२९) सकाळी ५ च्या सुमारास घोटी(ता.किनवट)शीवारात शेतकरी आनील कदम यांच्या शेतात घडली.                त्यांच्या शेतातील विहीरीत सकाळी ५ च्या सुमारास नर जातीचा आस्वल पडला सकाळीच ही घटना शेतकऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांना सांगीतले.घोटी कमठा परिसरात नेहमीच नर अन् मादी जातीच्या आस्वलाचा वावर असतो. त्या वीहीरीत नर जातीचे आस्वल पडल्यानंतर मादी आस्वलाने पळ काढल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले. किनवटचे वनक्षेत्रपाल प्रमोद राठोड हे सकाळी ११ च्या सुमारास वन कर्मचाऱ्याचा ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले .वीहीरीत बाज टाकून दोरीने अस्वलाला काढण्याचा प्रयत्न केला, पण आस्वल मोठा असल्याने तो

 विहीरीत पुन्हा पुन्हा पडत होता. नंतर वाघाचा पिंजरा मागविण्यात  आला व मदतीला पैनगंगा अभयारण्यातील खरबी, कोरटा(जि.यवतमाळ) वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले.आडीच तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आस्वल पिंजऱ्यात आडकला. नंतर त्याला पैनगंगा अभयारण्यात सोडून दिले.

  किनवट वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एल.राठोड,वन्य

जीव पैनगंगा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितिन आटपाटकर, वन्यजीव पैनगंगा कोर्टाचे वनपरिक्षेत्राधीक्षक विनायक खैरनार हे तिन्ही अधिकारी आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्न करुन विहिरीत पडलेल्या अस्वलास सुखरूप बाहेर काढले व पिंजऱ्यात बंद करून जवळच असलेल्या पैनगंगा अभयारण्यात त्याला सोडण्यात आले. विहिरीत पडलेल्या अस्वलाला बाहेर काढण्यासाठी तिन्ही वनपरिक्षेत्राचे वन कर्मचारी, अधिकारी यांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे अखेर  विहिरीत पडलेल्या अस्वलास जीवदान मिळाले व ते सुखरूप अभयारण्यात गेले. हिवाळा संपून उन्हाळयाची चाहूल लागताच आता वन्य प्राणी हे पाण्याच्या शोधात मनुष्य वस्तीच्या दिशेने येतात. यापूर्वी तालुक्यात अशाच अनेक घटना घडल्या आहेत. कारण जंगलातील वन्य प्राण्यांचे पाण्याचे पानवठे आटल्याने  हिंसक प्राणी हे मनुष्य वस्तीच्या दिशेने पाण्याच्या शोधात येत असतात. 


No comments:

Post a Comment

Pages