"बदलत्या काळात कौशल्य पूर्ण शिक्षण महत्वाचे"-अखिलेंद्र यादव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 30 January 2023

"बदलत्या काळात कौशल्य पूर्ण शिक्षण महत्वाचे"-अखिलेंद्र यादव

मुंबई :

जीवनदीप महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील शैक्षणिक, वयक्तिक व सांघिक गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी ठाण्याचे आयकर आयुक्त अखिलेंद्र यादव उपस्थित होते. त्यांनी सध्याच्या घडीला यश मिळविण्यासाठी प्रयत्नही वेगवान असायला हवेत याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रगतीवर प्राचार्य डॉ. के.बी. कोरे यांनी सादरीकरण केले. यानंतर विविध सांस्कृतिक व संगीतमय कार्यक्रम संपन्न झाले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. के.बी. कोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रिया जाधव व प्रा.पौर्णिमा एगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.दौलतराव कांबळे यांनी केले. यावेळी अभिनेते समीर पाटील, सागर पगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, संचालिका स्मिता घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहणे,  प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Pages