राष्ट्रीय मतदार दिनी उत्कृष्ट मतदार नोंदणी करणार्‍या बीएलओंचा सत्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 29 January 2023

राष्ट्रीय मतदार दिनी उत्कृष्ट मतदार नोंदणी करणार्‍या बीएलओंचा सत्कार

किनवट. दि.29 (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी हा दिवस संपूर्ण देशात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो. मतदारांना विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, मतदानाच्या कर्तव्याची जाणीव व्हावी व मतदान प्रक्रियेतील आपल्या मताचे पावित्र्य मतदारांपर्यंत पोहचावेत या उद्देशाने बुधवारी (दि.25) तालुक्यात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात विशेष कार्यक्रमात उत्कृष्ट मतदार नोंदणी करणारे अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले.


           सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नेहा भोसले, भाप्रसे यांनी उत्कृष्ट मतदार नोंदणी बद्दल जिल्हास्तरीय सत्कारासाठी नामांकन मिळाल्याबद्दल सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांचा सर्वप्रथम सत्कार केला. त्यानंतर त्यांचेच हस्ते उत्कृष्ठ बी.एल.ओ. मारोती हनमंत मुलकेवार (शिवाजीनगर), शोभा देविदास जाधव (दरसांगवी सी.), ज्योती शिवाजी गीते ( वझरा बु.), संध्या दत्तात्रय पांडागळे (कोल्हारी) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच निवडणूक विभागातील यादव देवकते, इनामदार एराजोद्दीन, किशोर कावळे, पाडुरंग अकोले, मनोज कांबळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.


        पाटोदा (बु) येथील आदीम कोलाम जमातीतील नवमतदार अमोल दीपक कुंभेकर, आकाश गुलाब मेश्राम व विकास दडंजे यांना मतदार कार्ड वितरीत करण्यात आले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व सर्वांकडून मतदारांसाठीची शपथ घेतली. दरम्यान बीएलओ मारोती मुलकेवार व नवमतदार अमोल कुंभेकर यांनी मनोगत व्यक्त केले.


      यावेळी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अनिता कोलगणे, मोहम्मद रफीक व महसूल सहायक उपस्थित होते. सोबतच मतदार जनजागृतीसाठी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये रांगोळी , निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Pages