किनवट. दि.29 (प्रतिनिधी) : येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांतर्गत सामाजिक दायित्व या नात्याने लोककल्याण हेतू बुधवारी (दि.25) पोलीस स्टेशन किनवट येथे चार बैरिकेट्स चे वितरण करण्यात येऊन, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हासंघचालक संतोष तिरमनवार, पोलीस निरीक्षक दिलीप बोरसे, सहायक पो.निरीक्षक विशाल वाठोरे, पो.उप निरीक्षक मिथुन सावंत तसेच जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक ओद्दीवार, सचिव प्रा. प्रकाश उत्तरवार , उपाध्यक्ष अनिरुद्ध केंद्रे, विहिपचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव मच्छर्लावार, किरण ठाकरे, देवगिरी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष डॉ. उत्तम धुमाळे, प्रकाश टारपे, राष्ट्रसेविका समितीच्या संयोजिका सौ.अंजली राठोड पतसंस्थेचे संचालक रोहित चडावार, राजू कट्टावार, संचालिका डॉ.अनुराधा उपासनी, पतसंस्थेचे व्यवस्थापक सुरेश पवार, प्रविण सातुरवार, संजय ताटीकुंडलवार,गजानन शिरपुरे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment