अॅड.मिलिंद सर्पे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 11 January 2023

अॅड.मिलिंद सर्पे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

किनवट ,ता.१२(बातमीदार): कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा वसंतराव नाईक हरीत क्रांती जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक "सकाळ",चे तालुका  बातमीदार अॅड.मिलिंद सर्पे यांना  जाहीर झाला आहे. कंधार येथे नुकतेच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.


हिंदवी बाणा लाईव्हच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दरवर्षी कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारितेत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. गेल्या ३६ वर्षापासून जिल्ह्यातील दलित, आदिवासी ,शोषित, वंचित, पिडीत, कामगार, शेतकरी, शेतमजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी पत्रकारितेत आपली लेखणी झिजविणाऱ्या मिलिंद सर्पे यांना यावर्षीचा वसंतराव नाईक हरीत क्रांती ग्रामविकास जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वीही सर्पे यांना भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा जिल्हा युवा गौरव  यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.त्यांनी सन १९९०-९१ मध्ये तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून बी.जे.ही पदव्युत्तर पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे.त्यानंतर त्यांनी दै.'अजिंठा', मधून पत्रकारितेत पदार्पण केले होते.

 घोषित झालेल्या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मित्रमंडळींनी अॅड.मिलिंद सर्पे यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages