डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २९ वा नामविस्तार दिन - डॉ.ईश्वर नंदपुरे यांचे व्याख्यान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 11 January 2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २९ वा नामविस्तार दिन - डॉ.ईश्वर नंदपुरे यांचे व्याख्यान


   औरंगाबाद, दि.११: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २९ वा नामविस्तार दिन १४ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने डॉ.ईश्वर नंदपूरे (नागपूर) यांचे विद्यापीठाच्या नाटयगृहामध्ये शनिवारी सकाळी १०ः३० वाजता विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले भुषविणार आहेत. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.मुस्तजीब खान यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages