प्रा.भिमानंदजी काळे यांचा राष्ट्रवादीतुन रिपब्लिकन युवासेनेत प्रवेश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 11 January 2023

प्रा.भिमानंदजी काळे यांचा राष्ट्रवादीतुन रिपब्लिकन युवासेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी :

हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे औंढा तालुका अध्यक्ष भिमानंदजी काळे यांनी पक्षाला रामराम करत मा.आंनदराज आंबेडकर यांच्या समक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली  मुंबई येथे जाऊन राजग्रहात रिपब्लिकन युवासेनेत जाहीर प्रवेश घेतला ‌.


अनेक राजकीय पक्षात काम केले परंतु श्वास गुदमरत होता आज आंबेडकर घराण्याच्या रिपब्लिकन सेनेत प्रवेश घेतल्याने श्वास मोकळा घेत असल्याचे प्रा‌.भिमानंद काळे यांनी प्रतिक्रिया देताना बोलले.


यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी त्यांना पुष्पहार घालून पक्षात प्रवेश दिला.नंतर युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या शिफारशीनुसार त्यांची रिपब्लिकन युवासेना हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष पदि निवड करण्यात आली.

यावेळी परभणी पुर्व जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी, पच्छीम जिल्हाध्यक्ष शरदराव चव्हाण, परभणी युवा जिल्हाध्यक्ष प्रितम वाकळे,भिटासे परभणी जिल्हाध्यक्ष अर्जुन पंडीत, पुर्णा तालुका अध्यक्ष विशाल खंदारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages