औरंगाबाद :येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागात 6 जानेवारी 2023 शुक्रवार रोजी,दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ साहित्यीक, माध्यम - समीक्षक व लेखक प्रा. जयदेव डोळे सर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, विभागाचे विभागप्रमुख नि आमचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. दिनकर माने सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाहू पाटोळे सर,डॉ. संजीवकुमार सावळे सर, डॉ.नामदेव सानप सर, प्रा. बसवेश्वर बिरादार, प्रा. रमेश वाघ व डॉ. मिलिंद आठवले व संशोधक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते, या दर्पण दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता ठोंबरे यांनी केले, तर आभार धनश्री देशमुख यांनी मानले. बी.ए.व एम.ए.च्या विद्यार्थ्यांनी केले होते, अत्यंत सुरेख व देखणा इव्हेंट मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी केला होता, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्या सर्व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Saturday, 7 January 2023
जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागात दर्पण दिन उत्साहात साजरा
Tags
# महाराष्ट्र
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment